Pimple Saudagar : तरुणांमध्ये देशभक्ती जागृत राहिली पाहिजे – अॅड. उज्ज्वल निकम

एमपीसी न्यूज – सध्याची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली असून त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आई वडिलांना या धावपळीच्या युगात वेळच नाही. त्यामुळे अनेक तरुण आपल्या कर्तव्यापासून भरकटले आहेत. आई वडिलांचे सेवा व देशसेवा यापासून ही तरुणाई फार लांब असल्याचे भयावर चित्र सध्या समाजात आहे त्यामुळे तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करण्याची गरज आहे से प्रतिपादन अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले. पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ” बदलत्या युगाचा बदलता युवा ” याविषयावर ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

या प्रसंगी उद्योजक शंकर जगताप, वसंत काटे, पी.के.स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नति सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, आनंद हास्य योगा क्लब, नवचैतन्य हास्य क्लब, अजिंक्य भिसे स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उन्नति सोशल फौंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समाज प्रबोधनकर शारदा मुंडे, दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारी तारा सोफेश धडफळे सेन्टर यांना आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार, वाल्मिक कुटे व योगेश मालखरे यांना सेवारत्न पुरस्कार, किशोर नखाते यांना मल्लविद्या रत्न पुरस्कार, अनिल पिंपळीकर व ज्ञानेश्वर जगताप यांना क्रीडारत्न पुरस्कार, उमेश धूत यांना अभिनयरत्न पुरस्कार, हर्षवर्धन यादव यांना क्रीडा रत्न पुरस्कार, सागर काटे यांना बलसेवारत्न पुरस्कार, शिवप्रसाद डांगे यांना शब्दरत्न पुरस्कार, हेमा खंडागळे यांना युवारत्न पुरस्कार अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.