Pimple Saudagar : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूृज – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक संजय भिसे यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानिमित्ताने परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे , पिके स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष सखाराम नखाते, पी के स्कूलच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर , ह भ प संतोषमहाराज पायगुडे , यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यानिमित्ताने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच वकील, डॉक्टर, विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा तसेच दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला, यात पीके स्कूलच्या जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पातळीवर क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला .

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले विद्यार्थ्यांनी संकटाला न घाबरता येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन तसेच परिस्थितीवर मात करून अभ्यासाची चिकाटी ठेवल्यास यश हे निश्चित मिळते, संकटावर मत करण्याची हिम्मत आपल्यामध्ये असणे गरजेचे आहे कितीही संकटे आली तरी मन विचलित न होऊ देता संकटावर मात केली पाहिजे त्यामुळेच प्रगती शक्य आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिड दिवसाची शाळा शिकुन नही एवढे मोठे साहित्य निर्माण केले कारण त्यांनी आलेल्या परिस्थितीवर मात केली होती, म्हणूनच कष्ट जिद्द चिकाटी ज्यांच्याकडे आहे तेच जीवनामध्ये यशस्वी होतील .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.