Pimple Saudagar : क्रांतिसूर्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

एमपीसी  न्यूज –  व्ही.एच.बी.पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पीके इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिसूर्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

महात्मा फुलेंच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या ओळी –

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।  नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्तविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।

ह्या ओळी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितली . विद्यार्थ्यांनी देखील महात्मा फुलेंच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली . या कार्यक्रमासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका संगीता पराळे , सविता आंबेकर, सर्व शिक्षक , विद्यार्थी  आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनीता मजूकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.