Sangvi : पिंपळे सौदागरमध्ये पावणे दोन लाखांची घरफोडी 

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी एक लाख 87 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

ललिता ब्रम्हारामबिका श्रीकाकुलम (रा. मिथिला नगरी, स्वराज गार्डनच्या मागे, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ललिता या 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आपल्या कुटुंबासह सिंगापूर येथे सहलीकरिता गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरातील लोखंडी कपाटातील एक लाख 87 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिन्यांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.