Pimple Saudagar : नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली – शत्रुघ्न काटे

एमपीसी न्यूज – साई चौक येथील पुलाचे बांधकाम चालू असताना काळेवाडीकडून औंध मार्गे पुण्याकडे जाणा-या वाहनाला शिवार चौकांतून वळुन परत साई चौक जगताप डेअरीकडे वळावे लागत होते. नागरिकांच्या सोयीसाठी एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

साई चौक येथील उड्डाणपुलाची एका लेन (काळेवाडी ते औंध मार्गचे )उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते.साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळण वळण असलेले परिसरातील चौक आहे परंतु या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्येमध्ये दिवसे दिवस वाढ होत चालली होती. नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते .

यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेने व नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या सतत पाठपुराव्याने नवनगर विकास प्राधिकरण यांच्या मार्फत साई चौक येथे उड्डाणपूल बांधण्याबाबत ठरविण्यात आले होते. तरी साई चौक येथील उड्डाणपुलाची एक बाजू (काळेवाडी ते औंध मार्ग) चे काम पुर्ण झाले असून नागरी वाहतुकीस  सज्ज झाले. तसेच उड्डाणपुलाची दुसरी बाजूचे (औंध ते काळेवाडी) काम ही प्रगतीपथावर असून लवकरच ती बाजू ही वाहतुकीस खुली करण्यात येणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.या उड्डाणपुलामुळे या परिसरामध्ये  आयटी कंपनी हिंजवडी हब मध्ये काम करणारा मोठा वर्ग आणि रहिवासियांना वाहतुकीच्या प्रश्नाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाकड,डांगे चौक,नाशिक फाटा आणि पुणे मध्ये जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर झाला असुन या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे .

यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सचिन पटवर्धन, नगरसेविका आरती ताई चोंधे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे,पोलिस निरीक्षक नितिन जाधव, सतीश माने पालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.