Pimple Saudagar : दिवाळीसाठी माहेरून पैसे आणले नाही म्हणून सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – दिवाळीसाठी माहेरहून पैसे, सोने, टीव्ही, भांडी आदी वस्तू आणाव्यात तसेच मालमत्तेतील हिस्सा देखील मागून घ्यावा या मागणीसाठी सासूने सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडली आहे. या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेने थेट पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील एका 31 वर्षीय विवाहितेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपली सासू सुरेखा बाळकृष्ण बोडके व नणंद माया सचिन गव्हाणे यांच्याविरुद्ध लेखी तक्रार केली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा नोंदविण्याचे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Pune FDA : गुजरात बर्फीचा 5 लाख 90 हजार रुपयांचा साठा जप्त

दिवाळी जवळ आल्यामुळे माहेरून पैसे, सोने, टीव्ही, भांडी आदी वस्तू आणाव्यात तसेच माहेरच्या प्रॉपर्टीतील हिस्सा मागून घ्यावा यासाठी सासू व नणंदेने आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पीडित महिलेेने केली आहे. माहेरची परिस्थिती बेताची असल्यामुळे काहीही घेऊन येण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे चिडून सासूने लोखंडी वस्तू डोक्यात मारून तसेच गळा आवळून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

चुलत सासऱ्यांनी पीडितेला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली. जखमी अवस्थेत पीडित महिलेला निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले.

आपली सासू आणि नणंद आपला शारीरिक व मानसिक छळ करीत असून आपल्याला स्मशानात पाठविण्याची म्हणजेच जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यांच्यापासून आपल्या जीवितास धोका आहे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.