Pimple Saudagar : दुकानाच्या जागेसाठी पत्नी व मेहुण्याकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानाची जागा मिळावी (Pimple Saudagar) म्हणून पतीलाच पत्नीने व मेहुण्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. हि घटना पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौकात बुधवारी (दि.22) सकाळी घडली आहे.

 

याप्रकऱणी सुरेश शंकर जुनवणे (वय 50, रा.जगताप डेअरी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पत्नी व मेहुणा सोमनाथ अशोक तांबे (वय 35, रा.मधुबन कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : राज ठाकरेंच्या विरोधात तरुणाची पोलिसात तक्रार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी व मेहुणा हे बुधवारी सकाळी फिर्यादी यांच्या दुकानावर आले. दुकानाची जागा बळकावण्यासाठी फिर्यादीला दुकानाच्या बाहेर काढण्याचा (Pimple Saudagar) प्रय़त्न केला.

त्याला फिर्यादीने नकार दिला असता सोमनाथ याने फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर पत्नीने प्लास्टिकच्या  पाईपने फिर्यादीला बेदम मारले. यात फिर्यादी जखमी असून वाकड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.