Pimple Saudagar : सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्ता कामाला प्रारंभ, नाना काटे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – कापसे लॉन्स ते द्वारका सनक्रिस्ट सोसायटी (Pimple Saudagar) पर्यंतच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्ता कामाला प्रारंभ झाला. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते कामाला सुरुवात करण्यात आली. जागा मालक आणि महापालिकेत समन्वय घडवून आणत काटे यांनी रस्त्याचा मार्ग मोकळा केला.

रहाटणी, पिंपळेसौदागर मधील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीकटचे झाले आहेत. परंतु, कापसे लॉन्स ते द्वारका सनक्रिस्ट सोसायटी पर्यंतचा रस्ता अजूनही डांबरी स्वरूपाचा होता. गेली अनेक दिवसांपासून स्थानिक सोसायटी धारकांनी काटे यांच्याकडे मागणी करत हा रस्ता सुद्धा सिमेंट काँक्रीटचा करण्याची मागणी केली होती. परंतु, काही कारणास्तव रस्ता होऊ शकत नव्हता.

Pimpri : …तर महापालिकाच खासगी तत्त्वावर चालविण्यास द्या

नागरिकांच्या रस्ता मागणीची दखल  घेऊन काटे यांनी महापालिका (Pimple Saudagar) स्थापत्य विभाग तसेच पालिका आयुक्त यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला. पालिका प्रशासन व मुळ जमीन मालक हिरामण कापसे यांच्यात योग्य समन्वय साधला. जागा मालक हिरामण कापसे यांना योग्य मोबदला मिळावा जेणेकरून रस्त्याचे रखडलेले काम लवकर चालू होईल अशी विनंती प्रशासनास केली. त्याला पालिका प्रशासन तसेच कापसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज अखेर रस्त्याचे काम सुरु झाले.

हा रस्ता हा 12 मीटर असून या कामास 3 कोटी 9 लाख रुपये एवढा निधी मंजुर झाला आहे. प्रशस्त अशा रस्त्याच्या एका बाजुला  फुटपाथ व दुसऱ्या बाजुला ऍटग्रेड तसेच दोन्ही बाजूस अत्याधुनिक एलईडी पथदिवे,नागरिकांसाठी उत्तम अशी बैठक व्यवस्था असे नियोजन असेल.

या उदघाटन प्रसंगी संबंधित रस्त्याचे ठेकेदार पृथ्वी इंटर प्रायझेसचे विजय पवार, इंजिनिअर दलित कांबळे, सोसायटी सभासद दीपक कोठावडे, अंकित सिंग ,किशोर पाटील ,सावन मेहता ,हेमराज लांडे ,धनंजय मागरूळकर,अमित मालपुरे ,प्रशांत देशपांडे ,रॉबिन कायस्थ, ज्ञानेश कवाडे, भूषण नेरकर, मयंक अवधिया, मुकुल कामत, अमन कामत  तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.