Pimple Saudagar : उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे कोरोना विषयी जनजागृती व मोफत मास्कवाटप

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिलादिन निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध थरात समाज कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर जगात थैमान घातलेल्या करोना व्हायरस वर मात करण्यासासाठी जनजागृती व मास्क चे वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, स्वप्ना काटे, पी. के. स्कूलचे अध्यक्ष जगन्नाथ काटे , डॉ. विद्या देवरे, डॉ. अनुराधा ज्ञानमोटे, प्रा. डॉ. उल्का भिसे, मुग्धा खान्देशे, प्राचार्या मंगला चव्हाण यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

सध्या देशासह जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे . त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, जर घरातील महिला तंदुरुस्त असेल तर त्यांचे कुटुंब सुखी व समाधानी व निरोगी राहील त्यामुळे महिलांनी आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना आवाहन केले.

 

यावेळी कुंदा भिसे म्हणाल्या, आपण जेवढी आपल्या परिवाराची काळजी घेतो तेवढी आपण स्वतःची देखील काळजी घेतली पाहिजे त्याकरिता सध्या सुरु असलेल्या करोना विषाणु संक्रमणापासून बचाव करण्यासाठी मास्क व सनेटाइजर देऊन काळजी घेण्यास सांगितले, जर घरातील महिला सुरक्षित तर घर सुरक्षित असल्यामुळे महिलांनी आपली काळजी घ्यावी त्याचबरोबर आपल्या परिसरातील महिलांनाही सुरक्षित राहण्याचा सल्ला द्यावा असे आवाहन कुंदा भिसे यांनी केले. वसुधा गोडसे  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आश्विनी भिसे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.