Pimple Saudagar Crime News : वायरिंग बदलण्यासाठी आले आणि तिजोरी साफ करून गेले, पिंपळे सौदागरमध्ये 3.40 लाखाची चोरी

एमपीसी न्यूज – घरातीली खराब झालेली वायरिंग बदलण्यासाठी आलेल्या कामगारानींच घरातील तिजोरीवर हात साफ करत 3 लाख 40 हजार रूपयांची चोरी केली आहे. कास्टालिया सोसायटी, पिंपळे सौदागर येथे शुक्रवारी (दि.02) दुपारी हा प्रकार घडला.

याप्रकरणी शिवराज देविदास घाटोळ (वय 33, रा. कास्टालिया सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि.03) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सर्व्हिस मार्केट या कंपनीच्या कामगारांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज यांच्या घरातील खराब झालेली वायरींग बदलण्यासाठी सर्व्हिस मार्केट या कंपनीतून कामगार आले. कामगारांनी फिर्यादी यांच्या घरातील कपाटातून 1 लाख 90 हजार रोख रक्कम आणि 37.5 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.