Pimple Saudagar : साई चौकाच्या उड्डाणपुलाची अधिका-यांकडून पाहणी

साई चौकातील उड्डाणपुलाची एक  लेन वाहतुकीसाठी खुली

एमपीसी न्यूज – डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साई चौक येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.

साई चौक येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी  निगडी प्राधिकरण कार्यकारी अभियंता संदीप खलाटे, सल्लागार अधिकारी राहूल जगताप, विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता  महेश  कावळे  आदी उपस्थित होते.
साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळण वळण असलेले परिसरातील चौक आहे परंतु या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्येमध्ये दिवसे दिवस वाढ होत चालली होते .नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते . या उड्डाणपुलामुळे या परिसरामध्ये  आयटी कंपनी हिंजवडी हब मध्ये काम करणारा मोठा वर्ग व रहिवासियांना वाहतुकीचा प्रश्नाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे .  या उड्डाणपुलामुळे वाकड , डांगे चौक , नाशिक फाटा आणि पुणे मध्ये जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर होऊन या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.