Pimple Saudagar : अंधत्व निवारणासाठी ग्लोबल आय इन्स्टिटयूटचा पुढाकार

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर ( गणेशन, बीआरटी रोडलगत) येथे नव्याने सुरू केलेल्या ग्लोबल आय इन्स्टिटयूटच्या वतीने अंधत्व निवारणासाठी” नेत्रदान काळाची गरज “या विषयावर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी नगरसेवक शतृघ्न काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात 2008 साली पहिली नेत्रपेढी सुरू करणारे नेत्रतज्ज्ञ डॉ बबन डोळस, रेटीना तज्ञ डॉ निलेश चाकणे, कॉर्निया तज्ञ डॉ सुमित वानखेडे यांनी ग्लोबल आय इन्स्टिटयूट चे संचालक असलेले यांनी मार्गदर्शन केले.

डोळयांच्या उपचाराविषयी विविध तपासण्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या उपचारपद्धती विषयक माहिती रेटीना तज्ञ संचालक डॉ.निलेश चाकणे यांनी सांगितली. अत्याधुनिक पद्धतीमुळे व नेत्रपेढी यामुळे अंधत्व निवारणात ग्लोबल आय इन्स्टिटयूट हे मोठे योगदान देत राहील असा विश्‍वास कॉर्निया तज्ञ संचालक डॉ.सुमित वानखेडे यांनी व्यक्‍त केला.

ग्लोबल आय इन्स्टिटयूट हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून भविष्यात जनजागृतीचे विविध उपक्रम राबवणार आहे असे संचालक डॉ बबन डोळस यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून येत्या 10 ते 16 मार्च रोजी जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त ग्लोबल आय इन्स्टिटयूट येथे मोफत काचबिंदु निदान व सवलतीच्या दरात तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.