Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथील विकास कामांची महापौरांकडून पाहणी

0 823

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर येथील विविध विकासकामांची महापौर राहूल जाधव यांनी आज पाहणी केली. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे महापौरांचे अधिका-यांना आदेश दिले.

HB_POST_INPOST_R_A

आज पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मधील रहाटणी- पिंपळे सौदागर येथील विविध विकास कामांची महापौर राहूल जाधव यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, ड क्षेत्रीय कार्यालय अधिकारी विजय खरोटे, सहाय्यक उद्यान अधिक्षक पी.एम. गायकवाड, क्रीडा विभाग उपअभियंता गेंगजे, विद्युतचे उपअभियंता गलगले, स्थापत्य उपअभियंता डी. एन. गट्टुवार, स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुनील पाटील, स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, नगररचना उपअभियंता बागवानी, जलनिस्सारणचे उपअभियंता सूर्यंकांत मोहिते, सहाय्यक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 28 मधील रोझआयकॉन शेजारी प्ले ग्राऊंड,45 मीटर बीआरटीएस रोडवरील लीनियर गार्डन, पिंपळे सौदागर गावातील व्यायामशाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भाजी मंडई, गोविंद – यशदा चौकातील सब-वे, विविध बस स्टॉप, रोझलॅंड शेजारील राजमाता जिजाऊ उद्यान तसेच उद्यानांमधील पाण्याच्या टाकीची पाहणी केली.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: