Pimple Saudagar : जननी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घरेलू कामगारांच्या मुलांसाठी शालेय साहित्य वाटप

39

एमपीसी न्यूज – ‘फ्रेंडशिप डे’ म्हणजेच मैत्रीदिनाचे औचित्य साधून जननी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पिंपळे सौदागर येथील साई अँबिअन्स – व्हिजन सोसायटीमधील घरेलू कामगारांच्या मुलांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

HB_POST_INPOST_R_A

पिंपळे सौदागर येथील साई अँबिअन्स – व्हिजन सोसायटीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला नगरसेवक शत्रुघ्न काटे, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका निर्मलाताई कुटे, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक नागरगोजे, उद्योजक दीपक गांगुर्डे, साई अँबिअन्स-व्हिजन सोसायटीचे चेअरमन योगेश मैद, विजय पाटील, सावळे, कांतीलाल पुरी तसेच मोठ्या संख्येने सोसायटीतील सदस्य आणि मुलांचे पालक उपस्थित होते.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्वांना संबोधित करताना जननी चॅरिटेबल ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशा या सामाजिक उपक्रमात जननी चॅरिटेबल ट्रस्टला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

साई अँबिअन्स-व्हिजन सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून कार्यरत असलेले माधव शिंदे यांची मुलगी कुमारी ज्ञानेश्वरी शिंदे ही 16 वर्षाखालील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून सध्या ती औरंगाबाद येथे इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत आहे. तिची संपूर्ण 10वी च्या शालेय शिक्षणाची जबाबदारी जननी चॅरिटेबलने घेतली आहे. तसेच जननी चॅरिटेबलतर्फे दुष्काळग्रस्त भागातील मंगळापुर ता. कोरेगाव येथे 65 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. सूत्रसंचालन प्राजक्ता फुके यांनी केले. संदीप फुके यांनी आभार व्यक्त केले.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: