Pimple Saudagar : उन्नतीच्या पतंग बनविण्याच्या कार्यशाळेला मुलांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मकर संक्रात निमित्त मोठ्या प्रमाणात चायना बनावटीचे पतंग व मांजा बाजारात दाखल झाला आहे . या मांज्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत. त्यामुळे पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने टाकाऊ पासून टिकावू या धोरणाचा अवलंब करीत रद्दी पासून व झाडूच्या काड्या पासून पतंग बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील शेकडो मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला.

यात संध्या कार्तिक हिने पहिला क्रमांक मिळविला तर लावण्या सागर काटे हिचा दुसरा क्रमांक आला, विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकांना ट्राफी व सन्मानपत्र देण्यात आले.

पतंग बनविण्याचे कार्यशाळा रामदास शिंदे यांनी घेतली. पतंगासाठी लागणारे कागद कसे कापावेत, त्यासाठी काड्या कुठल्या प्रकारचे असाव्यात याचे त्यांनी प्रात्यक्षिक दाखवून मुलांकडून पतंग तयार करून घेतले. यावेळी चायना बनावटीचा माजा न वापरता साधा दोरा वापरण्याबद्दल मुलांची व पालकांची जनजागृती करण्यात आली. पालकांनी देखील मुलांना चायना मांजा खरेदी करण्यापासून रोखावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी उन्नतीच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, माधुरी वाणी, संदीप वाणी, सागर काटे, बाबासाहेब साळुंके, अभिजित परब, आत्माराम भालेकर, प्रशांत पाटील, प्रशांत साळवे, योगेश मेखा, प्रवीण कासोदेकर आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.