Pimple Saudagar: लक्ष्मणभाऊ, महेशदादांना हरवणे सोपे नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना हरवणे सोपे नाही, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पालिका झाली. विधानसभा झाली. आता लोकसभा शिल्लक आहे. ‘पुढल्यावेळी करुन टाकू’ असेही ते म्हणाले.

आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त पिंपळेसौदागर येथे आज (शनिवारी) त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी पाटील बोलत होते.

महापौर उषा ढोरे, भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, सभागृह नेते नामदेव ढाके, राजेश पिल्ले, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, पूजा लांडगे, अश्विनी जगताप, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

राजकारणात नेते पत्नीला बरोबर घेवून येत नाहीत. पण, दोनही आमदार आपल्या पत्नींना घेवून आले आहेत. घरातल्यांना देखील राजकीय, सामाजिक कामाची माहिती पाहिजे असे सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, या दोनही आमदारांनी आपला राजकीय जीवनपट उलघडला आहे. निवडणुका कशा लढविल्या. त्यांनी स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना त्यांना हरवणे सोपे नाही.

पाटील पुढे म्हणाले, जे करावे ते नीट करावे. मी दोनदा पदवीधर मधून निवडून आलो. पक्षाचे नेतृत्व जे सांगेल ते ऐकायचे असते. पक्षाच्या आदेशानुसार कोथरुडमधून लढलो. अनेकांनी पाडण्याचा प्रयत्न केला. पण, मला विजयाची खात्री होती आणि निवडून आलो. आता एक वर्ष झाले. आत्तापर्यंत अपयश आले नाही. कोणतीही चुकीची गोष्ट करायची नाही. झोपताना आपल्याला समाधान वाटले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.