Pimple Saudagar : पी. के. स्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथील पी .के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

जगन्नाथ काटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती सांगून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचाराचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन दीप्ती आमले, सारिका पत्की यांनी केले तर आभारभक्ती लवेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.