Student Felicitation: नाना काटे सोशल फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज : माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना काटे सोशल फाउंडेशन व नगरसेविका शितल काटे यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी,(Student Felicitation) पिंपळे-सौदागर परिसरातील 10 वी व 12 वी परिक्षेतील 565 उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आला.(Student Felicitation) यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे , माजी नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शीतल नाना काटे, स्वाती उर्फ माई काटे, मायाताई बारणे, माजी नगरसेवक शंकर काटे, स्वीकृत नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, मा. नगरसेवक राजेंद्र साळुंखे, सतीश दरेकर, हरिभाऊ तिकोणे, युवा नेते श्याम जगताप, नवनाथ नढे, विवेक वेलणकर, प्रशांत सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, सागर कोकणे, भाऊसाहेब लांडे, महापालिका शाळेचे मुख्याध्यापिका प्रा. सुरेखा जोशी, उद्योजक प्रदीप तापकीर, भोयार सर यांच्यासह परिसरातील अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Maharashtra Ministers Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे गृह,अर्थमंत्रालयाची जबाबदारी

नाना काटे म्हणाले, कोविड काळात ऑनलाईन शिक्षण घेताना शिक्षक समक्ष भेटले नाहीत. मात्र घरातील आई वडील यांनी मुलाचे शिक्षकाची भूमिका घेत मुलांना परिक्षेत यश मिळविण्यात मोलाचा वाटा उचलला म्हणून पालकांचे विशेष आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.