Pimple Saudagar : पिंपळे सौदागर श्री मुंजोबा महाराज मंदिरात पानफुल अर्पण करून उत्सवास प्रारंभ

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे श्री मुंजोबा महाराज उत्सवाला आज, सोमवारपासून मोठ्या भक्तिभावात सुरुवात करण्यात आली. मंदिरात पानफुल अर्पण करून उत्सवास प्रारंभ करण्यात आला.

आज, सोमवारी सकाळपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सर्व परिसरात भक्तिमय वातावरण दिसून येत होते. अनेक प्रकारच्या फुलांनी मुख्य मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता. सकाळी सात वाजता श्री मुंजोबा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. अकरा वाजता गावातील सर्व देवतांना ढोल ताशांच्या निनादात पानफुल वाहण्यात आले.

सकाळी 7 ते 8 मुंजोबा महाराजाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. नंतर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत मुंजोबा महाराजांच्या मंदिरात ग्रामस्थांनी पानफुल अर्पण करून गावातील इतर देवतांची ग्रामस्थांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी मुंजोबा उत्सव कमिटीचे अध्यक्ष विनायक अर्जुन काटे व मुंजोबा उत्सव समितीचे आजी माजी पदाधिकारी व गावातील लहान थोर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.