Pimple Saudagar News: महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून पूरग्रस्तांना सहाशे किलो धान्य

एमपीसी न्यूज – कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.  त्यांना सावरण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून महाराष्ट्र वारकरी  महामंडळाच्या वतीने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून  पूरग्रस्तांना मदत जीवनावश्यक साहित्यासह सहाशे किलो धान्य जमा  करण्यात आले.

या वेळी महामंडळाचे अध्यक्ष विजय जगताप, उपाध्यक्ष तानाजी काळभोर, सचिव आप्पा बागल, पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख संजय भिसे, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या  अध्यक्षा कुंदा भिसे, संपर्कप्रमुख किशोर पाटील, सदस्य सचिन घोडे यांच्यासह वारकरी महामंडळाचे तसेच उन्नती सोशल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र वारकरी महामंडळ नेहमीच मदतीसाठी तत्पर असते. यावेळीही कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील संकटग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी आपलाही छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला असे, महामंडळाचे अध्यक्ष विजय जगताप यावेळी म्हणाले.

दरम्यान, महामंडळाच्या वतीने उन्नती सोशल फाऊंडेशनकडे सर्व मदत सुपूर्द करण्यात आली असून फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मदत लवकर पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा  भिसे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.