Pimple Saudagar News : कौतुकास्पद ! ‘उन्नती’च्या वतीने पिंपळे सौदागरमधील दिव्यांग नागरिकांना मोफत लस

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेली अतोनात जीवितहानी लक्षात घेता तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तविण्यात आलेल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्याच्या उद्देशाने उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत दिव्यांग नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. तर अन्य नागरिकांचे सवलतीच्या दरात लसीकरण करण्यात आले.

फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. माजी नगरसेवक शंकर जगताप व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

या मोहिमेंतर्गत नागरिकांना अत्यंत सवलतीच्या दरात फक्त 780  रुपयांमध्ये कोव्हिडशिल्ड ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिसरातील दिव्यांग नागरिकांसाठी ही लस मोफत देण्यात आली. या वेळी सफाई कामगार, घरकाम करणाऱ्या महिला इतर गरजुंना मोफत देण्यात आली व यावेळी लस घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांना फाउंडेशनच्या वतीने एक वृक्षाचे रोप भेट देण्यात आले.या लसीकरण उपक्रमात 172 नागरिकांनी सहभाग नोंदवला !

फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे म्हणाल्या, अंध-अपंग, दिव्यांग व घरकाम करणाऱ्या महिला असतील तर अश्या गरजू नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्याचा त्रास होऊ नये व इतर नागरिकांना देखील जवळ लस भेटावी म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला.

यापुढे आम्ही असे समाजपयोगी उपक्रम घेत राहू. ज्या ज्या सोसायटीचे चेअरमन व सहकारी या उपक्रमाचा लाभ आपल्या सोसायटीतील नागरिकांना व्हावा व प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी उपक्रमात आमच्या सोबत आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. इतर सोसायट्यांनी सहभागाची तयारी दाखविल्यास उन्नति फाउंडेशन प्रत्येक सोसायटीमध्ये हा उपक्रम नागरिकांच्या हितासाठी घेण्यास तयार आहे. त्यासाठी फाउंडेशनच्या कार्यालयात संपर्क करावा .

माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले, आज संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या उन्नति सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेऊन ही लसीकरण मोहीम राबविली हे अत्यंत कौतुकास्पद आहे. शहरातील इतर संघटना व नेत्यांनीही अशाप्रकारे लसीकरण मोहीम राबविल्यास पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

अल्को सोसायटीचे चेअरमन विजय भांगरे म्हणाले, ज्या ज्येष्ठ नागरिकांना दूर अंतरावरील लसीकरण केंद्रावर जाणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी सोसायटीत लसीकर सुरु केल्याने जेष्ठांना खूप फायदा झाला. त्याबद्दल उन्नति फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे सोसायटीतर्फे खूप आभार.

अतुल पाटील, राजेंद्र जयस्वाल, विकास काटे, विवेक भिसे, शुभम ननावरे, योगेश बाविस्कर, अल्को सोसायटीचे सेक्रेटरी लक्ष्मण जाधव, राहुल सावजी,अक्षय कुलकर्णी व इतर नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.