Pimple Saudagar News : 18 वर्षाय युवकाला चाकू व कोयत्याने गंभीर मारहाण

एमपीसी न्यूज – अनोळखी इसमांनी 18 वर्षाय युवकाला चाकू व कोयत्याने गंभीर मारहाण
केली आहे. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर येथे शुक्रवारी (दि.21) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. युवकाला पाण्याचे बॉटल घेऊन या ठिकाणी बोलाविण्यात आले होते.

तेजस राजेंद्र गोवळकर (वय 18 रा. शेंडगे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात मारेकरी यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवकाला एक फोन आला फोनद्वारे 20 लिटरच्या 10 बाटल्या गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर येथे घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान फिर्यादी याठिकाणी पोहोचले असता तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीला चाकू व कोयत्याने गंभीर मारहाण केली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.