Pimple Saudagar News : ब्राह्मण एकता मंचतर्फे पूरग्रस्त चिपळूणवासियांना पिण्याच्या पाण्याची मदत

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे चिपळूणमध्ये पूराचे पाणी शिरले, यामुळे चिपळूणवासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चिपळूणमधील पूरग्रस्तांना ब्राह्मण एकता मंचतर्फे मदतीचा हात पुढे केला असून, मंचच्या वतीने चिपळूणवासियांना पिण्याच्या पाण्याची मदत करण्यात आली आहे.

पिंपळे निलख येथील पंचवटी इमारतीमध्ये गुरुवारी (दि.29) हा कार्यक्रम पार पडला. ब्राम्हण एकता मंच नेहमीच सामाजिक उद्देश ठेवून समाजासाठी मदत करण्यात तत्पर असतो. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या चिपळूणवासियांना मंचच्या वतीने मदत पाठवण्यात आली आहे.

यावेळी प्रशांत कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, श्रीकांत वैद्य, सुषमा वैद्य,अवंती कोटस्थाने, अमोल कोटस्थाने, आनंद काळे, युवराज गायधनी, जयंत जोशी, रागिणी कुलकर्णी, दिनेश चांडक, एमपीसी न्यूजचे अनुप घुंगुर्डे, कुणाल सरस्वत, नितीन करंबळेकर आणि प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.