Pimple Saudagar News : उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे बांधकाम मजुरांच्या मुलांसमवेत ख्रिसमस साजरा

एमपीसीन्यूज : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे पिंपळे सौदागर परिसरातील गरीब मुलांसमवेत ख्रिसमस सण साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

नाताळमध्ये पांढरी दाढी आणि लाल कपड्यातला सांताकॉल्ज येतो आणि मुलांना भरपूर खाऊ,खेळणी देऊन जातो, अशी गोष्ट मुलांना सांगितली जाते.

त्यामुळे या प्रेमळ नाताळबाबाचे सर्वांना आकर्षण असते. पिंपळे सौदागर येथील बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी मात्र उन्नती फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे याच सांतासांताकॉल्जच्या रूपात आल्याचे पहावयास मिळाले.

_MPC_DIR_MPU_II

फाउंडेशनच्या माध्यमातून या मुलांना भेटवस्तू ,खाऊ तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. या अनोख्या ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे ही मुले आनंदीत झाल्याचे दिसून आले.

यविषयी बोलताना अध्यक्षा भिसे म्हणाल्या की, “ आपण साजरा करत असलेल्या सणाचा आनंद हा आपल्या आजुबाजूच्या गरीब मुलांना देखील मिळावा व त्यामुळे आपल्याही आनंदात भर पडावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रेमळ नाताळबाबाचं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण असतं. पण पिंपळे सौदागर परिसरामध्ये राहणार्‍या बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी मात्र उन्नती फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्षा कुंदा भिसे यांनी या चिमुकल्यांना भेटून व त्यांच्यासमवेत नाताळ साजरा केला. त्यांनी दिलेल्या भेटवस्तू व साधलेल्या संवादामुळे या मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले.

आम्ही खरा खुरा सांता पाहिला नाही. पण आमच्यासाठी कुंदाताई याच सांता आहेत, अशा भावना यावेळी या मुलांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.