Pimple Saudagar News : भटक्या श्वानांच्या मदतीसाठी चॅरिटी शो

एमपीसी न्यूज – भटक्या श्वानांच्या मदतीसाठी किडस्, मिस्टर, मिस आणि मिसेस पुणे 2021 हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता. भटक्या श्वानांच्या अन्न, निवारा यासाठी निधी उभा रहावा, हा या शोचा मुख्य उद्देश होता. रविवार (दि. 28) पिंपळे गुरव याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.

वन अकॉर्ड प्रोडक्शन यांच्या माध्यमातून हा शो उपक्रम राबवला जात आहे. पिंकी चंदानी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता.

_MPC_DIR_MPU_II

स्पर्धेत किडस् विभागात शेषा शेट्टी, मिस गायत्री हाडवळे, मिस्टर यश थोरात आणि मिसेस विभागात माधुरी पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना क्राऊन आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, अनमोल वाघमारे यांनी या उपक्रमासाठी पाच हजार रूपयांचे दान दिले. तसेच, अंजली जंगम न मृणाल इमानदार यांनी श्वानांसाठी खाद्यपदार्थ दान केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.