Pimple Saudagar News : उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने शाडू मातीच्या पाचशे गणेश मूर्तींचे वाटप

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने 'ऐच्छिक दान दानपेटीत टाका व हवी ती शाडू मातीची व तुरटीचे गणेश मूर्ती घेऊन जा' ह्या उपक्रमाची सुरुवात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.

एमपीसीन्यूज : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने ‘ऐच्छिक दान दानपेटीत टाका व हवी ती शाडू मातीची व तुरटीचे गणेश मूर्ती घेऊन जा’ ह्या उपक्रमाची सुरुवात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सुमारे पाचशे गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले.

आमदार जगताप म्हणाले कि तुरटीचे आपणा सर्वांना खूप फायदे असून व शाडू मातीचे गणपती नागरिकांना ऐच्छिक दान पद्धतीने देऊन पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी हा उपक्रम खूप फायदेशीर ठरेल.

यावेळी उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे,संस्थापक संजय भिसे, नगरसेवक शत्रूघन काटे, नगरसेविका निर्मला कुटे , पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, पी. के. इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे, उद्योजक राजू भिसे, अशोक हिरामण काटे, राजेंद्रनाथ जयस्वाल,अशोक पटेल,अश्विनी भिसे, कविता भिसे, रुक्मिणी जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने मागील तीन वर्षांपासून ‘ ती ‘चा गणपतीची स्थापना केली जात आहे . तसेच परिसरातील नागरिकांना शाडू मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्ती दिल्या जात आहेत.

त्याचबरोबर गणेश मूर्ती घरीच विसर्जन करून त्या मातीमध्ये तुळशीचे रोपटे लावावे म्हणून गणेश भक्तांना कुंडी व तुळशीचे रोपटे मोफत दिले जात आहे.

यंदा फाउंडेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच तुरटी पासून बनवलेल्या गणेश मूर्ती आणल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याचा मानस उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने राबविला जात आहे.

फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. घरच्या घरीच नागरिकांनी गणेश उत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी मागील तीन वर्षापासून आम्ही पर्यावरण पूरक शाडू माती पासून बनवलेल्या गणेश मूर्ती ऐच्छिक दान या उपक्रमाअंतर्गत गणेश भक्तांना गणेश मूर्ती देत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.