Pimple Saudagar News: पेपर वाटणाऱ्या सुजितला शिक्षणासाठी नाना काटे यांच्याकडून सायकल, स्कूल बॅग भेट

एमपीसी न्यूज: समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात पेपर वाटप करणारा (Pimple Saudagar News) इयत्ता आठवीतील सुजित टारझन सिंग या विद्यार्थ्याला माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सायकल स्कूल बॅग भेट देवून मदतीचा हात दिला आहे. यावेळी त्याच्या जिद्द चिकाटीचा गौरव केला.

प्रभागातील विकास कामांची पाहणी करताना सुजित टारझन सिंग हा मुलगा पिंपळे सौदागर परिसरात दैनंदिन पेपर टाकण्याचे काम करत असल्याचे त्यांना दिसून आले. काटे यांनी त्याला थांबवून त्याची माहिती घेतली. सुजित हा वडीलांसोबत राहत असून तो दररोज 150 घरी जावून पेपर टाकत आपले शिक्षण पूर्ण करत असल्याची माहिती समोर आली. त्याचे वडील टारझन सिंग एका सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करतात. घरची आर्थिक परिस्थिती कठिण असल्याने शिक्षणाबरोबर त्याला लहान मोठी कामे करावी लागत आहे. अशा जिद्दी, गरीब व गरजू विद्यार्थ्याला “एक हात मदतीचा” म्हणून नाना काटे यांनी सायकल सोबत स्कूल बॅग भेट देत त्याच्या लढवय्या व जिद्दीला मोलाचा हातभार लावला.

PCMC News: अधिकारी, कर्मचा-यांचे भावनिक ऐक्य, सामंजस्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा

15 ऑगस्ट रोजी नाना काटे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांची तयारी असतानाही वेळ काढून सुजित याला नानांनी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले.(Pimple Saudagar News) त्याचा दैनंदिन दिनक्रम, शैक्षणिक धडपड व घरातील आर्थिक बजेट बसवण्यासाठी करत असलेली कष्टाची कामे आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांची माहिती घेतली. हे एकल्यानंतर त्याच्या वडीलांना फोन करून मनातील संकल्पना सांगितली. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांची आपल्या घरातील आर्थिक परिस्थितीचा परिणाम होवू नये. त्यांची शिक्षण घेताना त्याला पायी चालत जावं लागू नये म्हणून सायकल भेट देण्याची संकल्पना सांगितली. याचा सुजितच्या वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी मुलाला सायकल भेट दिल्यानंतर नानांचे आभार व्यक्त केले.

 

नाना काटे यांनी मला दिलेल्या सायकलचा उपयोग माझ्या शैक्षणिक काळात अमूल्य ठेवा राहणार आहे. सायकलमुळे माझा वेळ व पायी जाण्याचे कष्ट वाचणार आहे. याचा सदुपयोग पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास सुजितने व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.