Pimple Saudagar News:  कुणाल आयकॉन रोड हॉकर्स मुक्त

एमपीसी न्यूज – महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या प्रयत्नातून, सर्व हॉकर्स चालक व्यवसायिक यांच्या सहकार्याने कुणाल आयकॉन रोड येथील सर्व हातगाडी, पथारी, विक्रेते यांचे आज  (बुधवारी) रोसेलेंड सोसायटी शेजारील राजमाता जिजाऊ उद्यान येथील पार्किंगच्या जागेत स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे कुणाल आयकॉन रोड हॉकर्स मुक्त झाला आहे.

पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन हा रोड होकर्स मुक्त व्हावा अशी येथील सर्व गृहनिर्माण सोसायट्यामधील नागरिकांनची मागणी होती. त्या दृष्टीने माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या प्रयत्नातून व सर्व हॉकर्स चालक व्यवसायिक यांच्या सहकार्याने सर्व हातगाडी, पथारी, विक्रेते यांचे राजमाता जिजाऊ उद्यान येथील पार्किंगच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे सर्व कुणाल आयकॉन रोड हॉकर्स मुक्त झाला आहे.

 

यामुळे सर्व नागरिकांना भाजीपाला, फळे, खाद्य पदार्थ एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय देखील दूर होईल. त्याच धर्तीवर येत्या काही दिवसांत  शिवसाई रोड वरील हॉकर्सचे देखील पिंपळेसौदागर येथील भाजी मंडई येथे स्थलांतर करण्यात येणार आहे.  शिवसाई रोड देखील हॉकर्स मुक्त होईल, असे नाना काटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.