Pimple Saudagar News : कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला सत्कार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या भीतीने माणूस माणसापासून दूर गेला असताना आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या पिंपळेसौदागर येथील तरुणांनी एकत्र येत कोरोना रुग्ण, नातेवाईकांना मदत करण्याचे प्रेरणादायी काम केले. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी तरुणांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

पिंपळेसौदागर येथील साई मारी गोल्ड गृहनिर्माण संस्थेत आज (शनिवारी) खासदार बारणे यांच्या हस्ते कोरोना कालावधीत उल्लेखनीय मदत कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शिवसेना महिला आघाडी संघटीका अनिता तुतारे, विभाग समन्वयक विवेक तितरमारे, मच्छिंद्र देशमुख, विभाग संघटीका कमल गोडांबे, सोसायटीचे सदस्य अमर तिवारी, मनिष श्रीवास्तव, विनोद पाटील तसेच तुषार रेसिडेन्सीचे चेअरमन नितीन कोंढाळकर, सेक्रेटरी संजय कोरके, रेणुका कुलकर्णी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, “कोरोना कालावधीत हॉस्पिटल, कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था, अंत्यविधी करण्याचे कार्य या ग्रुपने केले. कोरोना काळात माणूस माणसापासून दूर गेला होता. घरातील सदस्यही अंत्यविधीला हजर राहत नव्हते. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून, कोरोनाची लागण होण्याची भीती असतानाही रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना मदत, धीर देण्याचे काम या ग्रुपने केले.

कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांचे अंत्यविधीचे कार्य केले. या ग्रुपने चांगले काम केले आहे. या कामामुळे अनेकांना धीर मिळाला. या ग्रुपची प्रेरणा घेऊन अनेकांनी अशाप्रकारे काम करावे असे त्यांचे प्रेरणादायी काम आहे. त्यामुळे या ग्रुपला प्रोत्साहन देण्यासाठी मी तिथे गेलो. त्यांच्या कार्याचे कौतुक, गौरव केला आणि अभिनंदन केले”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.