_MPC_DIR_MPU_III

Pimple saudagar News : उन्नती फाउंडेशनतर्फे नववर्षानिमित्त ‘ग्रीन पिंपळे सौदागर’चा संकल्प

2021 वृक्षांचे मोफत वाटप करीत नववर्षाचे स्वागत ; 'झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचावा, जीवन वाचावा',चा नारा

एमपीसीन्यूज : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशच्या  वतीने  पिंपळे सौदागर येथील स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे विविध जातीच्या सुमारे दोन हजार एकवीस वृक्षांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने ‘उन्नती’च्या वतीने ग्रीन पिंपळे सौदागर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी ‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचावा, जीवन वाचावा’, असा नारा देण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV

यावेळी उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सामाजिक कार्यकर्ते सतीश कांबळे, आनंद हास्य क्लबचे चेअरमन राजेंद्र जयस्वाल, अतुल पाटील, सागर बिरारी, तुषार  काटे, मंदा वाळके, रमेश वाणी, विठाई मोफत वाचनालय अध्यक्ष सुभाषचंद्र पवार, मोहिनी मेटे, संजय डांगे, विवेक भिसे, त्याचबरोबर आनंद योगाहास्य क्लब, नवचैतन्य हास्यपरिवार यांच्यासह विविध सोसायटी चेरमन, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

उन्नती सोशल फाउंडेशनने दर वर्षी मोफत झाडाचे रोपटे वाटप करण्याचा समाजपयोगी कार्यक्रम राबविल्या बद्दल नगरसेवक शत्रुघ्न काटे व परिसरातील नागरिकांनी फाउंडेशनचे कौतुक केले. असाच कार्यक्रम समाजातील प्रत्येक नागरिकांनी राबविला पाहिजे, असे मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_II

संजय भिसे म्हणाले, ” दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमानात वाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. यासाठी शहरात वृक्षलागवड आणि वृक्ष संवर्धनास प्राधान्य देणे आवश्यक आहे.

तसेच अधिकाधिक झाडे लागवडीसाठी सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.

सध्या विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे झाडांची संख्या कमी झाली असून निसर्गाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे ‘एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना राबवून प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. प्रत्येकांनी आपल्या मुलाप्रमाणे झाडांचे संगोपन करावे. पिंपळे सौदागर हे स्मार्ट सिटी असल्याने त्या परिसराला ” ग्रीन पिंपळे सौदागर करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे यावर्षी २०२१ वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. यामुळे नागरिकांनी त्याचे संगोपन व्यवस्थित करावे. कुंदा भिसे -अध्यक्षा, उन्नती सोशल फाऊंडेशन.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.