Pimple Saudagar News : मोफत आयुर्वेदिक तपासणी व उपचार शिबिराला प्रतिसाद

एमपीसीन्यूज : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने नवीन वर्षानिमित्त पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, डॉ. राणी बाबेल, डॉ. ओंकार बाबेल, आनंद हास्य क्लब चेअरमन राजेंद्र जयस्वाल, श्री विठाई मोफत वाचनालयाचे उपाध्यक्ष रमेश वाणी, सागर बिरारी, मोहिनी मेटे यांच्यासह परिसरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदा भिसे म्हणाल्या, सध्या कोरोना महामारीने नागरिक हैराण आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घेतला. खरे तर शहरात अशी शिबिरे ठिकठिकाणी आयोजित होणे गरजेचे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार अत्यंत गरजेचे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.