Pimple Saudagar News : कुंदा भिसे यांच्यावतीने अण्णासाहेब मगर शाळेला सॅनिटायजर मशीन भेट

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्यांपासून शाळा बंद होत्या. सध्या राज्य शासनाचे सर्व नियम पाळून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले. विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये सॅनिटायजर मशीन बसवण्यात आले. 

मुख्याध्यापक बुधा नाडेकर, नगरसेवक शत्रुघ्न  काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट् सहसंपर्कप्रमुख मनोज ब्राह्मणकर, गौरी कुटे, शंकर चोंधे तसेच  शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

कुंदा भिसे म्हणाल्या, अनेकांनी कोरोना आजाराचा सामना केला आहे. सध्या पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. अनेक दिवस घरातच बसलेले विद्यार्थी आनंदाने शाळेत आले असले तरी त्यांच्या मनात कोरोनाचे सावट आहे.

शाळेत येताना व घरी जाताना सॅनिटायजरने हात स्वच्छ करण्यासाठी मशीन देण्यात आले आहे. वाढदिवसाच्या दिवशी इतर खर्च करण्यापेक्षा समाजाच्या हितासाठी काही तरी करावे म्हणून हा उपक्रम घेण्यात आला आहे.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले,आपण समाजाच्या उपयोगी आले पाहिजे. कोरोना महामारीने माणसाला बरचं काही शिकायला मिळाले आहे. कुंदा भिसे यांनी हा चांगला उपक्रम घेतला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहाणार आहे. इतरांनीही असे उपकरण राबविण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.