Pimple Saudagar News : पिंपळेसौदागर येथे सेल्फी पॉईंट उभारा : नाना काटे

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागरमध्ये पी. के. चौक किंवा कोकणे चौक येथे “ WE LOVE PIMPLE SAUDAGAR, OUR PIMPLE SAUDAGAR SMART PIMPLE SAUDAGAR चे सेल्फी पॉइट उभारण्यात यावेत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत नाना काटे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्मार्ट सिटी अंतर्गत प्रभाग क्रमांक 28 रहाटणी, पिंपळेसौदागर या प्रभागात अनेक अत्याधुनिक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. संपूर्ण पिंपळे सौदागर परिसराचा विकास करत असताना नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळाल्याच पाहिजे. परंतु, सुसज्ज व स्मार्ट  परिसर मागे पडता कामा नये.

त्यासाठी प्रभागात सिमेट क्रॉंकीट रस्ते, पाण्याची टाकी, उद्यान, योगा पार्क, प्रभाग, विविध खेळाचे टर्फ मैदान, सुशोभीकरण, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, लिनियर गार्डन व इतर कामे होत आहेत. ती लवकरच पूर्ण होतील. तसेच प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागरमध्ये पी. के. चौक किंवा कोकणे चौक येथे WE LOVE PIMPLE SAUDAGAR, OUR PIMPLE SAUDAGAR, SMART PIMPLE SAUDAGAR या प्रकारचे सेल्फी पॉइट उभारण्यात यावेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.