Pimple Saudagar News: पिंपळेसौदागर परिसरात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपळेसौदागर रहाटणी परिसरातील लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे या भागात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक काटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 28 पिंपळेसौदागर, रहाटणी मधील लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याने शहरतील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढत आहे.

प्रभागातील जेष्ठ नागरिकांना प्रभागात लसीकरण केंद्र नसल्याने इतर ठिकाणी जावे लागत आहे. याचा जेष्ठ नागरिकांना त्रास होत आहे.

महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर, रहाटणी येथे महापालिका दवाखाना किंवा महापालिका शाळेमध्ये नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरु करण्यात यावे, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.