Pimple Saudagar News : जेष्ठांच्या कोविड लसीकरण नोंदणीसाठी ‘उन्नती’चा पुढाकार; केंद्रापर्यंत मोफत प्रवासाचीही सुविधा

एमपीसीन्यूज : समाजोपयोगी उपक्रमात अग्रगण्य असलेल्या उन्नती सोशल फाउंडेशनच्यावतीने जेष्ठांच्या कोविड लसीकरण नोंदणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी फाउंडेशनच्या वतीने जेष्ठांसाठी मोफत नोंदणी उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांनी पिंपळे सौदागर येथील फाउंडेशनच्या कार्यालयात जेष्ठांच्या नोंदणीची व्यवस्था केली असून, यामध्ये कोठे आणि कधी लसीकरण होईल याची माहितीही जेष्ठांना देण्यात येत आहे. शिवाय लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यायेण्यासाठी मोफत प्रवास सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या उपक्रमामुळे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे शक्य नसलेल्या जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकटे राहणारे तसेच मुले नोकरीनिमित्त परगावी वास्तव्यास असलेल्या जेष्ठांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे. त्यामुळे जेष्ठांकडून या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, फाउंडेशनद्वारे कोरोना काळातही बरेच समजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.