Pimple Saudagar: महापौरांनी लोकार्पण केलेला पूल ‘पीसीएनटीडीने’ केला बंद

एमपीसी न्यूज – पीसीएनटीडीतर्फे औंध ते काळेवाडी र्ता साई चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचे महापौर उषा ढोरे यांनी सोमवारी घाईघाईत लोकार्पण करत पुल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, पुलाचे काम अर्धवट असल्याचे सांगत ‘पीसीएनटीडीने’ आज (मंगळवारी) ढिगारा टाकून हा पुल बंद केला आहे. दरम्यान, प्राधिकरण प्रशासनाला कोणतीही पुर्वसूचना न देता केवळ श्रेय घेण्यासाठी महापौरांनी पुलाचे उद्घाटन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला होता.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून औंध ते काळेवाडी र्ता साई चौक येथे पुल उभारण्यात आहे. 700 मीटर लांबी आणि 8 मीटर रुंदी असलेल्या पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, पुलाचे काम पुर्ण झाल्याचे सांगत भाजपने काल पुल वाहतुकीसाठी खुला केला होता. महापौर ढोरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते.

पुलाचे काम बाकी असल्याचे सांगत प्राधिकरण प्रशासनाने आज (मंगळवारी) हा पुल बंद केला आहे. पुलावर प्रवेश करण्याच्या दोनही बाजुला मातीचे ढीग टाकले आहेत. वाहतुकीसाठीचा पुल बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, पुलाचे काम अद्याप बाकी आहे. राडारोडा तसेच खड्डे बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरींग उघड्यावरच आहे. अशा परीस्थितीमध्ये घाईघाईने उद्धघाटन करुन पुल वाहतुकीस खुला केला होता. यामध्ये एखादा दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? केवळ श्रेय घेण्यासाठी हा सर्व घाट घालण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.