Pimple Saudagar : गोविंद यशदा चौकात रस्त्यावर सांडलेले ऑइल साफ केल्यामुळे अपघात टळला

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक याठिकाणी शुक्रवारी (दि. 31) रस्त्यावर ऑइल सांडल्याची तक्रार मिळताच तातडीने पावले उचलत स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सहित येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधला व त्वरित अग्निशामक दलाने संपूर्ण रस्ता पाणी मारून साफ करून घेतला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते जयनाथ काटे, भूषण काटे, प्रविण कुंजीर, सौरभ काटे गोविंद यशदा चौकात पोहचले व मोठ्या प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम केले. त्याचप्रमाणे तातडीने अग्निशामक दलाला संपर्क साधला. त्वरित अग्निशामक दलाने संपूर्ण रस्ता पाणी मारून साफ करून घेतला. त्यामुळे वाहने घसरून मोठा अपघात होण्याचे टळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.