Pimple Saudagar News : रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपळेसौदागर येथील ट्रायोस गृहनिर्माण सोसायटी व झुलेलाल टॉवर सोसायटीचा प्रलंबित रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली. (Pimple Saudagar News) माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या प्रयत्नातून हे काम सुरु झाले आहे.

प्रभाग  क्रमांक 28 रहाटणी, पिंपळेसौदागर येथील झुलेलाल टॉवर  सोसायटी,ट्रायोस सोसायटी या सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण काही कारणास्तव अनेक वर्ष रखडले होते. त्यामुळे सोसायटी मधील नागरिकांना पावसाळ्यात, इतरवेळी अनेक समस्यानां सामोरे जावे लागत होते.

Pune metro :  मेट्रो धावली सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत

याबाबत माजी विरोधी पक्षनेते  नाना काटे, माजी नगरसेविका शितल काटे यांनी आयुक्त यांच्याकडे व संबंधित महापालिका विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा केला.(Pimple Saudagar News) या रस्त्याबाबत लवकर तोडगा काढण्यात यावा अशा सूचना केल्या. त्यानुसार आज या ट्रायोस व झुलेलाल टॅावर सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.  नाना काटे व शितल काटे यांनी केलेल्या प्रयत्नाचे सोसायटी मधील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.