Pimple Saudagar : संभाजी महाराज उड्डाणपुलाचे आमदार जगताप यांच्या हस्ते सोमवारी उदघाटन

एमपीसी न्यूज – जगताप डेअरी साई चौक येथील श्री छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाचे सोमवारी (दि. 31) सकाळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.

काळेवाडीकडून औंधकडे जाणारा पुलाचा एकेरी मार्ग सोमवारपासून खुला कऱण्यात येणार आहे याठिकाणी उड्डाणपुल व्हावा यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वेळवेळी पाठपुरावा करुन यातील एक लेन तयार झाली आहे. ती लेन सोमवारपासून वाहतुकीस खुली होईल. तर दुसरी लेन काही दिवसात सुरु होईल. या उड्डाणपुलामुळे येथील वाहतुकीचा मठा प्रश्न सुटणार आहे विशेषत आयटीयन्सला मोठा दिलासा मिळणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप व शत्रुघ्न काटे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे व संबधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हा एकेरी मार्ग सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा एकेरी मार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्याचे नियोजन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.