Pimple Saudagar : संजय भिसे उदयोगरत्न पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज – पुणे येथील शिवप्रताप प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणार उद्योगरत्न पुरस्कार पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांना देण्यात आला. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, तसेच अॅड अपर्णा रामतीर्थकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उदय परदेशी, गणेश परदेशी, केदार पाटील, पृथ्वीराज परदेशी, जयराज परदेशी, प्रदीप कांबळे, चंद्र शेखर कोरडे, गिरीश घोरपडे, नंदकुमार बोके, संदीप पांढरे उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कालवा फुटीच्या वेळी लहान मुलाचे प्राण वाचविणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी नीलम गायकवाड, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड, डॉ रवींद्र पोमण, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, सचिन सातव, अभिजित धोत्रे, जन्मेजयराज भोसले, संग्राम चौघुले, सुनील भजनावळे, श्रीगौरी सावंत, विजय चौधरी व डॉ हंसराज थोरात यांचाही समावेश होता.

विजय बोत्रे पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद परदेशी व आनंद परदेशी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.