Pimple Saudagar : बांधकाम क्षेत्रात सप्लायर्स म्हणून उत्तम सेवा देण्यात श्री चामुंडा स्टोन कंपनी अव्वल 

एमपीसी न्यूज – बांधकाम क्षेत्रात सप्लायर्सची उत्तम सेवा देण्यात श्री चामुंडा स्टोन कंपनी अव्वल असून त्यांच्या मार्फत मार्बल, टाइल्स, सीपीपीटी टाइल्स, ग्रॅनाईट व विविध प्रकारचे बिल्डिंग मटेरियल पुरवले जाते. गेली सोळा वर्षापासून श्री चामुंडा स्टोन कंपनी ग्राहकांच्या सेवेत आहे. त्यांचे हजारो ग्राहक कंपनीच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करतात. 

घर सुशोभीकरणात घरातील विविध वस्तूंना विशेष महत्व असते. त्याचाच एक भाग म्हणजे घरातील टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट या वस्तू देखील घराच्या सौंदर्यात विशेष भर घालतात. श्री चामुंडा स्टोन कंपनी हे हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले पिंपरी चिंचवड येथील एक अग्रगण्य शोरूम आहे. गेली 16 वर्ष श्री चामुंडा स्टोन कंपनी ग्राहकांच्या सेवेत असून त्यांचे बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, आर्किटेक यांच्या इतर हजारो समाधानी ग्राहक आहेत.

पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी जवळ असलेलें श्री चामुंडा स्टोन कंपनीचे शोरुम 10 हजार चौरस फूट जागेत असून त्यांचे भव्य गोडाऊन आहे. या ठिकाणी सर्व नामांकित कंपनीचे टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट उपलब्ध आहेत. तसेच ऑर्डरनुसार स्पेशल टाइल्स, इटालियन मार्बल, जग्वार, कोलर यासारखे साहित्य डिलिव्हरीसह पुरवले जाते. शहरातील नामांकित बांधकाम व्यवसायिक, ठेकेदार तसेच वैयक्तिक बंगला व घर बांधू इच्छिणारे या ठिकाणीच साहित्य खरेदीला पसंती देतात.

भव्य जागेत असलेल्या या शोरूममध्ये ग्राहकांना विविध प्रकारच्या डिझाईन सहज पाहता येतात. शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची सोय आहे. तसेच विकत घेतलेले साहित्य घेऊन जाण्यासाठी उत्तम सोय उपलब्ध आहे. श्री चामुंडा स्टोन कंपनी मार्फत ग्राहकांना आवश्यकतेनुसार कुशल कारागीर देखील पुरवले जातात. बांधकाम व्यवसायिक, ठेकेदार, आर्किटेक व मटेरियल सप्लायर्स यांच्यासाठी डेमो किट व प्रोजेक्टर शोरूममध्ये उपलब्ध आहे.

शोरुममध्ये काम करण्यासाठी 45 कर्मचारी असून त्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे “कोरोनाच्या” पार्श्वभूमीवर शो रूम मध्ये सोशल डिस्टंसिंग योग्य पालन होईल याची काळजी घेण्यात आली आहे. विना मास्क  कोणालाही शोरूमच्या आवारात प्रवेश करू दिला जात नाही तसेच, सॅनिटायझर स्टॅन्ड देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बांधकाम व्यवसायातील उत्तम दर्जाचा व  ब्रँडेड माल आमच्याकडे उपलब्ध आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील जवळपास 70 टक्के बांधकाम व्यावसायिकांना साहित्य पुरवले असल्याचे श्री चामुंडा स्टोन कंपनीचे मालक राकेश जैन यांनी सांगितले आहे. बांधकाम संबंधित साहित्य खरेदीचा विचार तुम्ही करत असाल तर, श्री चामुंडा स्टोन कंपनीच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या, असे आवाहन राकेश जैन यांनी केले आहे.

संपर्कासाठी पत्ता –

श्री चामुंडा स्टोन कंपनी

19/2, कोकणे पार्क, जगताप डेअरी जवळ, पिंपळे सौदागर

पिंपरी-चिंचवड

संपर्क क्रमांक -9881118882

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.