Pimple Saudagar : पक्षीप्रेमींना घातली नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी साद

एमपीसी न्यूज – लहान मुलांची ज्या पक्ष्याशी सर्वात आधी ओळख होते तो पक्षी म्हणजे चिऊताई. वाढत्या शहरीकरणामुळे शहरी भागात मात्र, गेल्या काही वर्षांत चिमण्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. या चिमण्यांना वाचवण्यासाठी विस्तृत चळवळ उभी रहावी, यासाठी २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ म्हणून साजरा केला जातोय. याच दिवसाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डन येथे पर्यावरणप्रेमी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि रोझलँड सोसायटी यांच्या योगदानातून चिमण्यांसाठी घरटी, खाद्य आणि पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आली आहे.

या उपक्रमाची सुरुवात पर्यावरण प्रेमी नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी रोझलँड सोसायटीचे चेअरमन संतोष म्हसकर, चंदन चोवरसिया, जिग्नेश मॅडम, अजय जैन, रोझलँड सोसायटीचे इतर सदस्य आणि आरोग्य विभागाचे सौदाई आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

काटे म्हणाले की, उंच इमारतींच्या छतांवर, आपल्या घराच्या गॅलरीत किंवा अगदी कुठेही चिमणी नेहमीच आढळून येते. लहान मुलांच्या भावविश्वात जितके स्थान चांदोबाला असते, तितकेच ते चिऊताईलाही असते. त्यामुळे, प्रत्येकाच्या मनात या चिमणीविषयी कुठे ना कुठे जिव्हाळा असतो. जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आहे.

चिमण्यांची संख्या कमी झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यातूनच जागत‌िक चिमणी दिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. ‌ही संख्या वाढावी म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणारे कार्यक्रमदेखील राबविले जात आहेत, त्याची सुरुवात पिंपळे सौदागरवासियांनीही केली आहे. चिमणी वाचवण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावेत अशी इच्छा काटे यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1