Pimple Saudagar : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

एमपीसी न्यूज – पिडीतेचे न्यूड फोटो (Pimple Saudagar) व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पिंपळे सौदागर येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार सन 2016 ते 25 मार्च 2022 या कालावधीत घडला.

रवींद्र रामचंद्र थोरात (वय 44, रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : चिखलीत बंगल्याच्या जिन्याचा दरवाजा तोडून केली चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे (Pimple Saudagar) आमिष दाखवले. त्यांना न्यूड फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेला मानसिक त्रास देऊन त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.