Pimple Saudagar : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे शनिवारी व्याख्यान

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी दिली. यानिमित्त ‘बदलत्या य़ुगाचा बदलता युवा’ या विषयावर विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे मार्गदर्शन करणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालयात शनिवारी (दि. 27) हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, उद्योजक शंकर जगताप, यशदा रिअॅलिटी ग्रुपचे अध्यक्ष वसंत काटे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, सामाजिक कार्यकर्त्या चंदा भिसे, पवना सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.