Pimple Saudagar : उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने बालदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो, यानिमित्ताने  पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने आधार बाल आंगण (मजदूर कामगार  मुलांची शाळा) शाळेमध्ये बालदिन साजरा उत्साहात करण्यात आला.
   

यावेळी उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, रुपाली धुमाळ, विकास काटे, राजेंद्र पाटील, आनंद हास्य क्लबचे सचिव राजेंद्र जयस्वाल , अतुल पाटील, रोहिदास गवारे, विवेक भिसे  यांच्यासह परिसरातील सामाजिक, राजकीय शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
यावेळी या शाळेतील लहान मुला मुलींना खाऊ, चित्रकलेचे  साहित्य, व शालेय उपयोगी  वस्तूंचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना  उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा  भिसे म्हणाल्या, आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे काही तरी देने लागतो ही भावना मनात ठेवून समाजातील सर्वच घटकांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्याची काळाची गरज आहे. कामगारांच्या ज्या मुला मुलींना शिक्षणासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते जर शहरातील सामाजिक संघटना,सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन जा यांना शालेय साहित्य पुरविले तर खर्या अर्थांनी बालदिन साजरा केल्या सारखे होईल .या निमित्ताने राजेंद्र पाटील व शाळेच्या व्यवस्थापक रुपाली धुमाळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.