Pimple Saudagar : उन्नती सोशल फौंडेशन आयोजित नवरात्री महोत्सवाचा समारोप

एमपीसी न्यूज- उन्नती सोशल फौंडेशन आयोजित नवरात्री महोत्सवाचा समारोप कोजागरी पौर्णिमा साजरी करून झाला.त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

या प्रसंगी उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, उद्योजक शंकरशेठ जगताप, जगन्नाथ काटे, गिरीश जाचक, राजू शेलार, उमेश शेलार, उद्योजक राजू भिसे ,अतुल पाटील, अजिंक्य भिसे, शंकर चोंधे ,भरत भिसे, प्रज्वल धनवटे ,साहिल कापसे तसेच या कार्यक्रमास पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील सर्व थरातील आबालवृद्ध महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

हा कोजागरी पौर्णिमा सोहळा उन्नती सोशल फौंडेशन, आनंद हास्य योगा क्लब, विठाई मोफत वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य क्लब पिंपळे सौदागर सर्व सभासद बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शरद पौर्णिमेच्या शीतल चंद्र प्रकाशात सर्वानी केशर शर्करायुक्त सुमधुर दुधा सोबत अल्पोपाहाराचा आस्वाद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.