BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Saudagar : पिंपळे सौदागरला रुबेरा लसीकरण मोहिम

एमपीसी  न्यूज -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली.

पिंपळे सौदागर येथे झालेल्या लसीकरण मोहिमेस नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे यांच्या हस्ते लहान बालकांना लस देऊन लसीकरण मोहिमेचे उदघाटन  करण्यात आले.या वेळी डॉ.शिवाजी ढगे डॉ.संगीता तीरुमनी,श्रीमती ढोले सिस्टर आदी उपस्थित होते.

यावेळी नाना काटे यांनी स्वच्छते संदर्भात व आरोग्यविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  ते म्हणाले, लहान मुलांना रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने ती सहजासहजी क्षयरोग, पोलिओ, धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, रूबेला, हिमोफिलीयस एन्फ्लुएंझा ब,मेंदुज्वर,न्युमोनिया आदी आजारांना बळी पडतात. बालवयात होणारे रोग टाळण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक म्हणजे लसीकरण. कोणत्याही रोग होण्याअगोदर त्यास प्रतिबंध करणे हाच खरा उपाय असतो. याच पार्श्वभूमीवर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. लसीकरणामुळे टाळता येऊ शकणाऱ्या रोगांना थोपवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये महत्त्वाचे यश मिळाले आहे.प्राप्त आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी जवळपास 49हजार 200 मुले मृत्युमुखी पडतात.

केवळ 9 महिने (पूर्ण) ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर व रूबेला प्रतिबंधक लसीची एक मात्रा दिल्यास गोवर रूबेलाची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही.पुणे जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रात 27नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत गोवर आणि रुबेलाची लस देण्यात येणार आहे. महापालिकेने जिजामाता हॉस्पिटल अंतर्गत 12 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक टीम 250 बालकांना लस देण्यात येणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2