Pimple Saudagar : भाजीपाला स्टाॅल थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये; नाना काटे यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात मंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकालाही बाजार उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्येच नागरिकांना थेट भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळत दोन ग्राहकांमध्ये तसेच ग्राहक व शेतकऱ्यांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात येत आहे.

लॉकडाऊन काळात गर्दी टाळण्यासाठी तसेच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. मात्र दैनंदिन भाजीपाल्यासाठी त्यांना घराबाहेर पडणे अनिवार्य आहे. यावर उपाय म्हणून विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट नागरिकांच्या दारापर्यंत घरपोच पोहचविण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

पिंपळे सौदागर भागातील सोसायट्यांमधील नागरिकांसाठी आज (शनिवारी)थेट प्रत्येक सोसायट्यांच्या पार्किंग आवारात भाजीपाल्याचा स्टॉल उभारला होता. यावेळी खबरदारी घेत सोशल डिस्टन्सिंग राखत दोन ग्राहक तसेच ग्राहक व शेतकऱ्यांमध्येही 3 फुटांचे अंतर राखण्यात आले होते.

यासंदर्भात बोलताना नगरसेवक नाना काटे म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम सगळ्यांवरच झाला आहे. मात्र सद्यस्थितीत लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, तरीही नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र, त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्यामुळे आम्ही पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी त्यांना दररोज लागणारा भाजीपाला थेट त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like