Pimple Saudagar : पिंपळेसौदागर, रहाटणीतील पाणी समस्या लवकरच सुटणार – नाना काटे

एमपीसी न्यूज – रहाटणी, पिंपळेसौदागर (Pimple Saudagar) येथील नागरिकांच्या पाणीपुरवठा करण्यासाठी कुणाल आयकॉन रोड येथील पाणी टाकीचे काम पूर्ण झाले. या भागातील गृहनिर्माण सोसायट्यांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू करण्यात आले आहे. हे काम लवकरात-लवकर पूर्ण केले जाईल. त्यामुळे लवकरच पिंपळेसौदागर, रहाटणीतील पाणी समस्या लवकरच सुटणार असल्याचा विश्वास माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केला.

रहाटणी, पिंपळेसौदागर मधील कमी व अपुऱ्या पाणी पुरवठ्या सदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. वेळोवेळी परिसरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेविका शितल काटे यांनी पाणी समस्येबाबत प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला. बैठका घेवून पाठपुरावा केला. पूर्वी या परिसरात ‘ड’ प्रभाग येथील टाकीवरून पाणी पुरवठा केला जात होता. परंतु, तो कमी होता ही समस्या पाहता काटे यांनी तत्कालीन आयुक्तांकडे कुणाल आयकॉन रोड येथे नवीन पाण्याची टाकी उभारण्यासाठी यासाठी  पाठपुरावा केला.  नवीन 20 लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर करून घेतली. टाकीचे काम पूर्ण झाले.

Indori Accident : इंदोरी येथे इंद्रायणी नदीत कार कोसळली; एकाचा मृत्यू

कुणाल आयकॉन रोड (Pimple Saudagar) वरील रोझलेंड सोसायटी जवळील 20 लाख लिटर नवीन पाणी टाकी मधून या भागातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन Water Distibution Pipe Line टाकण्याचे काम चालू करण्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना नाना काटे यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या. या पाणीच्या टाकीवरून कुणाल आयकॉन रोड वरील सर्व सोसायट्यांना पाणी पुरवठा केला जाईल. त्यामुळे कुणाल आयकॉन रोडवरील सर्व सोसायट्यांची पाणी समस्या लवकरच सुटेल असा विश्वास काटे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.