Pimple Saudagar : स्मार्ट सिटीतील पाणी प्रश्न सुटणार कधी ?

नगरसेवक नाना काटे यांचा आयुक्तांना सवाल

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मधील दैनंदिन गरज असलेला पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे सौदागर येथील प्रभाग क्रमांक 28 मध्ये लोकसंख्येचा विचार करता सध्या गावठाणांतील एकाच पाण्याच्या टाकीवरुन पाणीपुरवठा  केला जातो.  त्यामुळे नागरिकांना पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही.  प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर, रहाटणी हा स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झाला आहे. तरीही पाण्याचे नियोजन होत नाही. अनेक वर्षापासून नवीन पाण्याच्या टाकीची मागणी करीत होतो. याचा प्रयास म्हणून वर्षभरापूर्वी पिंपळे सौदागरसाठी दोन पाण्याच्या टाक्या मंजुर केल्या. निविदा काढल्या,पण काम मात्र शून्य राहिले. यात काही कुणाचा स्वार्थ लपलाय का, पिंपळे सौदागरमधील पाण्याची समस्या पाहता वेळोवेळी पाठपावा करुन अमृत योजनेतून पाण्याची टाकी रोझलॅन्ड सोसायटी शेजारील नव्याने विकसित होत असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यामधील जागेत सहा महिन्यांपूर्वी मंजुर करुन घेतली आगहे. प्रत्यक्षात जागेवर टाकीचे काम चालू झालेले नाही असे का, तरी संबंधित पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे यांच्याकडे लेखी आणि तोंडी तक्रार करुन सुध्दा तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी रामदास तांबे यांची बदली करण्यात यावी. महापालिकेने मंजुर केलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश आयुक्तांनी दयावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.